Friday, 25 September 2009

विमुक्त

                विमुक्त

मी माझ्याच जगात मग्न आहे...
चाकोरीचे वस्त्र फेडलेला, मी नग्न आहे...

ठरलेल्या चौकटी बाहेर जगण्याची ओढ आहे...
स्वताला पारखण्याची मला खोड आहे...

उन्हात, पावसात, थंडीत भटकण्याचा छंद आहे...
संपूर्ण ऋतुचक्र मनसोक्त जगण्यात, मी धुंद आहे...

माझ्या अंतरीची मला साद आहे...
आयुष्य माझे, खुळा नाद आहे...

शहाण्यांच्या जगात, मी खुळा अलिप्त आहे...
बंधनांना निर्बंध घातलेला, मी विमुक्त आहे...

7 comments:

 1. शहाण्यांच्या जगात, मी खुळा अलिप्त आहे...
  बंधनांना निर्बंध घातलेला, मी विमुक्त आहे...
  great!

  ReplyDelete
 2. मस्त, कविता आवडली.

  ReplyDelete
 3. छान आहे कविता!!

  ReplyDelete
 4. ठरलेल्या चौकटी बाहेर जगण्याची ओढ आहे...आयुष्य माझे, खुळा नाद आहे...
  मी पण विमुक्त!!!!!

  ReplyDelete
 5. atishay surekh kavitaa aahe....

  ReplyDelete