Thursday, 23 February 2012

पुणे ते गोवा... कोकणमार्गे... सायकलवर... पुर्वतयारी

साधारण ३ वर्षां पुर्वी मी सायकल घेतली... घेतल्या-घेतल्या लगेच सायकलवर पुण्याहून सातारा गाठलं... त्या नंतर पण सायकलवर भटकंती चालूच होती... तेव्हा असंच डोक्यात आलं होतं की एकदा 'पुणे ते गणपतीपुळे' सायकलवर जायचं... पण ह्या न त्या कारणांमुळे ते काही घडलं नाही... मग मी दुचाकी घेतली आणि त्यावर भटकणं सुरु झालं... सायकलकडे जरा दुर्लक्ष झालं...

इतक्यात, माझा मित्र यशदीप ने फारच भारी सायकल घेतली... Schwinn Sporterra Sport असं त्या सायकलच नाव... त्याला तर सायकलच प्रचंड वेड... सायकल घेतल्या पासुन साहेब रोज कामावर पण सायकलनेच जावू लागले... ये-जा करून ४० कि.मी. रोज... शनी-रवी मी पण त्याची सायकल चालवायचो... आता सायकल परत आयुष्यात आल्यामुळे जुन्या स्वप्नाला खत-पाणी मिळालं... पण आता 'पुणे ते गनपतीपुळे' च्या ऐवजी 'पुणे ते गोवा' असं स्वप्न सुरु झालं... जमेल का? सायकल वर कश्यासाठी? असले प्रश्न आम्हा दोघांना पडलेच नाहीत... खरंतर माझी काहीच तयारी नव्हती आणि सायकल वर इतक्या दूर जायचा अनुभव पण शुन्यच... बरं, पुण्याहून गोव्याला सायकलवर जायचं म्हणजे काय सोप काम नाही, बरीच तयारी करावी लागणार होती... सगळ्यात आधी घरच्यांना समजवून सांगायच होतं... आई लगेच तयार झाली, पण सायकल वरच का? असा यक्ष-प्रश्न माझी पत्नी, सपनाला पडला होता... कितीही समजवलं तरीही अश्या प्रश्नांची उत्तरं बायकोला पटायला निदान एक महीनातरी लागतोच.... म्हणून मग मी ट्रीपची तयारी सुरु केली... थोडंफार सायकलींगचा आणि पळायचा सराव सुरु केला... एक महीना होता हातात, पण मी काही नियमीतपणे तयारी नाही केली... तिकडे यशदीप तर फारच निवांत होता, साहजीकच होतं म्हणा ते... कारण तो तर नियमीतपणे रोज ४० कि.मी. सायकल चालवायचा आणि इतक्यातच तो 21km  ची Half-Marathon २ तासात न थांबता पळाला होता... म्हणजे थोडक्यात, ट्रीपसाठी यशदीप पुर्णपणे तयार होता...

ट्रीपला साधारण एक आठवडा बाकी असताना...  "मी पण ट्रीपला येणार आहे रे", असं म्हणत प्रसाद (माझा भाऊ) पण आमच्यात सामील झाला... तसा तो नियमीतपणे पळायला जातो आणि सायकल पण चालवतो, म्हणून मग आम्ही देखील लगेच तयार झालो... आम्ही तयार होतो, पण सायकलींच काय?... माझी Hercules MTB आणि यशदीपची Schwinn अश्या दोनच सायकली होत्या... पण म्हणतात ना, की मनापासून एखादी गोष्ट करायची असेल तर सारं जगच आपल्या मदतीला धावतं; अगदी तसंच घडलं... मी ज्या कंपनीत काम करतो तीथे आशीष म्हणून माझा एक मित्र आहे... तर त्याने मला त्याची Schwinn सायकल ट्रीप साठी दिली... महीनाभर ट्रीप साठी माझी चाललेली धडपड बघून सपनाने देखील होकार दिला... आता फक्त २१ जानेवारी उजेडायची वाट आम्ही तीघे बघत होतो..

3 comments:

  1. मस्त रे पशा !! छान लिहिले आहे.. परत लिहायला सुरुवात केलेली पाहून बरे वाटले..

    ReplyDelete
  2. Chan zal ahe article prashant! keep it up!

    ReplyDelete