प्लस व्हॅलीमधे उन्हाळ्यात गेलो होतो तेव्हाच ठरवलं होतं की आता पावसात इथे यायचं... एखादं चित्र काढताना चित्रकार आधी आराखडा तयार करतो आणि मग त्यात रंग भरतो... उन्हाळ्यातल्या प्लस व्हॅलीमधे आज एका महान कलाकाराने खूप सुंदर रंग भरले होते... धो-धो पाऊस होता... कड्यावरुन धबधबे सोडले होते... जागोजागी पाण्याचे ओढे खळाळत होते... दरीमधे धुकं अडकलं होतं... धरणीतून गवताचे कोवळे कोंब उगवले होते... जंगलातून सुभग पक्षी सुरात गात होते... सगळ्या सृष्टीत चैतन्य जाणवत होतं... तेरड्याच्या एखाद्याच फुलाला हे सगळं बघण्याची घाई झाली होती... कोवळ्या गवतातून मान वर करुन ते एकटचं हे सगळं अनुभवत होतं... आज ह्या सृष्टीचाच एक भाग होवून हे सगळं अनुभवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं होतं...
साधारणश्या ओढ्यातूनच दरीत उतरावं लागतं... उतार तसा जरा जास्त आहे आणि जंगल एकदम दाट... मी आणि यशदीप असे आम्ही दोघेच होतो... साधारण एक तासात दरीत उतरलो... दरीतला नजारा बघून केवळ निशब्द झालो... जणू वेळ थांबलीच होती... ओढ्याकाठी बसून भान हरपून जे काही दिसतयं त्याचा आस्वाद घेतला...
कोसळत्या धबधब्याकडे टक लावून बघण्यात वेगळीच मजा असते... क्षणा-क्षणाला तो वेगळा भासतो... सगळं कसं क्षणभंगुर असल्या सारखं वाटतं... प्रत्येक क्षण वेगळा आणि त्यातली मजा वेगळी... आणि अश्या वेळी अश्या जागी असलं की प्रत्येक क्षण जगता देखील येतो...
टीपः भटकंतीचा खूप अनुभव नसेल तर शक्यतो पावसात प्लस व्हॅलीमधे उतरु नका...
Subscribe to:
Post Comments (Atom)
massssta re!
ReplyDeletePlus valley kuthe ahe?
ReplyDeletebhaaaarrrrreeeeeee
ReplyDeletejabri.........
ReplyDeletefaar bharee ...
ReplyDeletekhupach sundar....!!!
ReplyDeleteआयला, या आधी हा ब्लॉग माझ्या वाचनातच आला नव्हता. सहि आहे. माझ्याप्रमाणेच एक भटक्या विमुक्त जमातीतील कोणीतरी मिळाला ते बरं झालं.
ReplyDeleteलिहित रहा.
२ महिने झाले रे कुठे हरवलास ...
ReplyDeletekhup sundar..............
ReplyDeletechan ahe.... maja ali....
ReplyDelete