शाल्मली म्हणजेच काटेसावर... ह्याची फुलं फारच सुंदर असतात... लाल-नारंगी झुंबरं अंगाखांद्यावर सजवून, त्यातला मध खाण्यासाठी काटेसावरीचं झाड अनेक प्क्ष्यांना आमंत्रण देतं... उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे झाड फुलांनी बहरतं... बहरलेल्या काटेसावरीच रुप केवळ मनाला वेड लावतं... भर दुपारच्या उन्हात निळ्या आकाशाच्या पार्श्वभुमीवर तर हे रुप अजूनच निखरतं...
"शाल्मली" हे नाव काटेसावरीच्या फुलांना फार साजेसं आहे आणि तितकच गोड देखील आहे... हे नाव ऐकून माझा मित्र रव्या म्हणाला "चार-पाच मुलींची नावं एकत्र घेतल्या सारखं वाटलं..."
खरय रे... "शाल्मली" हे नाव गोड आहे. माझी एक मैत्रीण आहे ह्या नावाची. तिला सुद्धा बरेचदा 'काटे सावर' असे सांगावे लागते. हेहे... तिला हा पोस्ट दाखवला. खुश झाली एकदम... :) फोटो छान आहेत ... :)
खुप सुंदर फोटो आहेत....माझ्या ऑफिसमधल्या डेस्कसमोरच खिडकीतून हे झाड दिसते....अगदी दररोज ह्याची रूपं बदलत असतात....कधी पानगळती तर कधी नवी पालवी.....अर्थात सगळीच रूप अतिशय आकर्षक, मनमोहक आणि दररोज तेवढीच नवीन!!! नुकतीच हिरवीगार पालवी फुटलेलं काटेसावरीचं रूप तर अहाहा!!! त्यातून डोकावणारी सूर्याची किरणं, शाल्मलीची गोड गुलाबी फुलं वर्णनातीत सौंदर्य!!! काम करता करता थोडावेळ त्याच्याकडे पाहिलं की एकदम “रिफ्रेश” व्हायला होतं.....आणि कधी कधी तर ह्याच्याकडे बघता बघता हरवून जायला होतं आणि मग (काम बाजूला राहतं).....
खरय रे... "शाल्मली" हे नाव गोड आहे. माझी एक मैत्रीण आहे ह्या नावाची. तिला सुद्धा बरेचदा 'काटे सावर' असे सांगावे लागते. हेहे... तिला हा पोस्ट दाखवला. खुश झाली एकदम... :) फोटो छान आहेत ... :)
ReplyDeleteखुप सुंदर फोटो आहेत....माझ्या ऑफिसमधल्या डेस्कसमोरच खिडकीतून हे झाड दिसते....अगदी दररोज ह्याची रूपं बदलत असतात....कधी पानगळती तर कधी नवी पालवी.....अर्थात सगळीच रूप अतिशय आकर्षक, मनमोहक आणि दररोज तेवढीच नवीन!!! नुकतीच हिरवीगार पालवी फुटलेलं काटेसावरीचं रूप तर अहाहा!!! त्यातून डोकावणारी सूर्याची किरणं, शाल्मलीची गोड गुलाबी फुलं वर्णनातीत सौंदर्य!!! काम करता करता थोडावेळ त्याच्याकडे पाहिलं की एकदम “रिफ्रेश” व्हायला होतं.....आणि कधी कधी तर ह्याच्याकडे बघता बघता हरवून जायला होतं आणि मग (काम बाजूला राहतं).....
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete