Monday 31 May 2010

मोहाची फुलं

एप्रिल महिन्यातलं मेळघाटचं जंगल... जंगलभर एकच वास... कसला? तर मोहाच्या फुलांचा... फुलं चविला अतीशय गोड... वास पण तितकाच गोड...

(मोहाच झाड)


(झाडाखाली पडलेला फुलांचा सडा)


(मोहाची फुलं)




फुलं इतकी गोड असतात की एका वेळेस ५-६ पेक्षा जास्त खाऊच शकत नाही... आणि जास्त वेळ वास घेतला तर नुसत्या वासानेच थोडी झिंग चढल्या सारखं वाटतं...

गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात... मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची... ह्या फुलांपासून खीर, गोड रोट, अन लापशी पण बनवतात...

2 comments:

  1. थोडी घेऊन आलास का रे?

    ReplyDelete
  2. पश्या, मोहाचा सीझन सुरू आहे सध्या... जिकडे तिकडे मोहच मोह... रोज सकाळी गावकरी गोळा करत असतात. चव तरी इतकी सुंदर आहे! फुलांचे खूपसे गुच्च असतात जवळजवळ संपूर्ण निष्पर्ण वृक्षावर. रिमझिम पाउस पडावा तशी एकेक फुले टपटप खाली पडत असतात. त्याच्या सोबतीला जंगलात पळस फुलून आला आहे. जिकडे तिकडे केशरी रंग. वातावरण खूपच भारी आहे सध्या...

    ReplyDelete